Last Updated on 29 Mar 2026 9:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
उरुण ईश्वरपूर शहरात आता भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या माध्यमातून पाईप लाईनद्वारे घरगुती गॅस पुरवठा केला जाणार आहे. या गॅस वितरण प्रकल्पाचा शुभारंभ माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या हस्ते,शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अध्यक्षते खाली आणि बीपीसीएलचे टेरीटरी मॅनेंजर विश्वजित खरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या (सोमवारी) दुपारी ४ वाजता होत आहे. पेठ- सांगली रस्त्यालगतच्या कोयना हॉस्पिटल समोरील समता कॉलनी मध्ये हा समारंभ होत आहे.
या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी केले आहे.
या समारंभास उरुण ईश्वरपूर शहराचे उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, माजी नगराध्यक्ष अरुणादेवी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, नगरसेविका सविता पाटील, मनिषा कुरळपकर, सचिन हांडे, जावेद इबुशे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा मनिषा पेठकर, योगिता माळी यांच्यासह नगरसेवक व मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
हा शहराच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे. बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर उरुण ईश्वरपूर नागरिकांचे स्वप्न सत्यात उतरत आहे. या प्रकल्पामुळे आता शहरातील माता-भागिनींना गॅस सिलेंडरची प्रतिक्षा करावी लागणार नाही. तर सुरक्षित पाईप लाईनद्वारे घरगुती गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. शहरातील जो भाग वंचित राहिला आहे,त्या परिसरातील नागरिकांची निवेदन स्विकारली जाणार आहेत. या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन संयजकांनी केले आहे.
टीप : बातमीतील व्यक्तीचा फोटो मूळ (Original) आहे. फोटोच्या चांगल्या सादरीकरणासाठी (Presentation) आणि ग्राफिक्ससाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.












































































