Last Updated on 16 Mar 2026 9:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गॅस वितरकांनी ‘ओटीपी’ (OTP) प्रणालीद्वारे घरपोच सिलिंडर वितरण करावे; जिल्हा प्रशासनाच्या सूचना
सांगली ।
जिल्ह्यात एलपीजी सिलिंडर वितरण आणि इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडून जिल्ह्यातील एलपीजी गॅस वितरकांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये सर्व गॅस वितरकांनी ओटीपी प्रणालीद्वारे घरपोच गॅस सिलेंडरचे वितरण करावे, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच गॅस वितरकांनी आपल्या अडचणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सांगितल्या. त्या शासनस्तरावर पोहोचवून योग्य उपाययोजना करण्यात येतील असे यावेळी प्रशासनामार्फत आश्वासित करण्यात आले.
सध्या जिल्ह्यात पुरेसा एलपीजी साठा उपलब्ध आहे. एचपीसीएल कंपनीचा २१९८ मेट्रिक टन, बीपीसीएल कंपनीचा २०८ मेट्रिक टन आणि आयओसीएल कंपनीचा ४४ मेट्रिक टन इतका साठा उपलब्ध असून आणखी १०९३.३ मेट्रिक टन एलपीजी साठा जिल्ह्यात येण्यास मार्गस्थ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलिंडर वितरित करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात साठा उपलब्ध :
HPCL : २१९८ मेट्रिक टन
BPCL : २०८ मेट्रिक टन
IOCL : ४४ मेट्रिक टन
या व्यतिरिक्त १०९६.३ मेट्रिक टन साठा सध्या मार्गस्थ आहे.












































































