Last Updated on 11 Mar 2026 8:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत माहिती
मुंबई ।
प्रवाशांना सक्षम प्रवासी सेवा देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ सदैव दक्ष आहे. ही सेवा अधिक सक्षमपणे देण्यासाठी एसटीमध्ये १७ हजार ७४२ चालक-वाहक पदांची भरती प्रस्तावित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
सदस्य श्रीकांत भारतीय यांनी राज्य परिवहन महामंडळाकडील रिक्त पद भरती संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य अनिल परब आणि सदस्य प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एसटी महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी नवीन बसेस खरेदी करण्यात येत असून दरवर्षी ५ हजार नवीन बस खरेदी करण्यात येणार आहे. नवीन बस खरेदीबरोबरच महामंडळामध्ये रिक्त असणाऱ्या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी १७ हजार ७४२ चालक व वाहक पदांच्या भरतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेत पूर्वी महामंडळामध्ये काम केलेल्या कंत्राटी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, विविध घटकांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या योजना, सेवा सुरू ठेवणे ही काळाची गरज आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगारही आता नियमितपणे वेळेवर दिला जात असून कर्मचाऱ्यांना खात्यात सात तारखेपर्यंत पगार जमा होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 11 Mar 2026 8:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत माहिती मुंबई । प्रवाशांना सक्षम प्रवासी सेवा देण्यासाठी राज्य परिवहन महा... Read more












































































