Last Updated on 06 Mar 2026 10:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अर्थसंकल्पात ‘मास्टरस्ट्रोक’
मुंबई ।
राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी आजवरचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर केली. या कर्जमाफीच्या योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल अशी घोषणाही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. यात त्यांनी अनेक घोषणा केल्या. पण अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष लागले होते. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यांनी दिलेला शब्द या अर्थसंकल्पात पाळला आहे. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. या घोषणेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिला मिळाला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना कृषी आणि ग्रामीण विकासाला केंद्रस्थानी ठेवत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. राज्याच्या आर्थिक विकासासोबतच शेतकरी आणि ग्रामीण भागाला बळ देण्यावर या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे.
३० सप्टेंबर २०२५ रोजी पर्यंत मिळणार कर्जमाफी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचीही घोषणा केली. राज्यातील ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकित असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी जाहीर करत आहे, असे ते म्हणाले.
कर्ज घेतलेले अनेक शेतकरी हे नियमित कर्ज भरत आहेत. अशा वेळी एकीकडे कर्जमाफी करताना दुसरीकडे अशा शेतकऱ्यांचा ही विचार या अर्थसंकल्पात केला आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत त्या शेतकऱ्यांना ५० हजाराचे अनुदान दिले जाणार आहे. राज्यातील बँकींग यंत्रणा सक्षम असावी यासाठी शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता, त्याला कायमस्वरुपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे अअसे ते म्हणाले. समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन उपाययोजना करणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
शेतमजुरांनाही अपघात विम्याचा लाभ
सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या योजनेचा लाभ आता शेतमजुरांनाही देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रसंगी शेतमजुरांनाही आर्थिक संरक्षण मिळणार आहे.
शेतकऱ्यांसाठी इतर महत्त्वाच्या घोषणा
⏩ मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद योजना
⏩ गोपीनाथ मुंडे अपघात अनुदान योजनेचा विस्तार करून आता त्यात शेतमजुरांनाही विमा संरक्षण दिले जाईल
⏩ आगामी दोन वर्षांत संपूर्ण राज्यात ‘महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान’ राबवले जाणार
⏩ बांबू उद्योगात ₹५०,००० कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित करून ५ लाख रोजगार निर्मिती
⏩ मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेच्या अंतर्गत ६ लाखांहून अधिक पंप
⏩ सौर कृषीपंप योजनेची गिनीज बुकात नोंद
⏩ महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान
⏩ मत्स्यसंपदा योजना
⏩ महाविस्तार AI या प्लॅटफॉर्मवर राज्यातील शेतकऱ्यांना पीकसल्ला आणि बाजारभावाची अचूक माहिती मिळत आहे
⏩ राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा वाटा वाढवण्यासाठी ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ सुरु करत आहोत…
⏩ ग्रामीण भागातील शेत पाणंद रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी पूर्ण यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने जलदगतीने काम करण्याकरिता ही योजना काम करणार
⏩ प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांवर रूफटॉप सोलार लावण्यासाठी अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून ऊर्जा स्वावलंबन साधणार.
⏩ महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजनेंतर्गत राज्यातील रस्त्यांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाईल. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांचे क्राँक्रिटीकरण करण्यात येईल.
खात्रीशीर बातम्यांसाठी आमचे व्हॉट्सॲप चॅनेल फॉलो करा:
https://whatsapp.com/channel/0029Va5qiey1yT21NvR3Ea3S






































































