Last Updated on 05 Mar 2026 11:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मिरज ।
महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागातील सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या दैनंदिन प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी मिरज तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे’ आयोजन करण्यात आले आहे. ७ मार्च २०२६ पासून मिरज तालुक्यातील ७ विविध महसूल मंडळांच्या ठिकाणी शिबिरे होणार आहेत.
शिबिरात मिळणाऱ्या प्रमुख सेवा
या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या १० प्रमुख सेवांसह इतर विभागांच्या योजनांचा लाभ घेता येईल:
महसूल विभाग : प्रलंबित फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, ई-मोजणी, पीएम किसान आणि तक्रार निवारण प्रणाली.
आरोग्य विभाग : आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड आणि वयोश्री योजना कार्ड नोंदणी.
इतर विभाग : नवीन रेशन कार्ड, आधार कार्ड दुरुस्ती, जन्म-मृत्यू दाखले आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचे अर्ज स्वीकारणे.
मिरज तालुक्यातील शिबिरांचे वेळापत्रक:
| अ.क्र. | दिनांक | महसूल मंडळ मुख्यालय |
| १. | ७ मार्च २०२६ | आरग |
| २. | १४ मार्च २०२६ | मालगाव |
| ३. | १० एप्रिल २०२६ | भोसे |
| ४. | १७ एप्रिल २०२६ | बेडग |
| ५. | २९ एप्रिल २०२६ | कवलापूर |
| ६. | ८ मे २०२६ | बेळंकी |
| ७. | १५ मे २०२६ | मिटज |
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी या शिबिरांमध्ये सहभागी होऊन आपल्या प्रलंबित कामांचा निपटारा करावा आणि शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे आणि तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी केले आहे.










































































