Last Updated on 08 Feb 2026 6:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के इतके मतदान, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
सांगली ।
सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 61 निवडणूक विभाग व 10 पंचायत समितीच्या 122 निर्वाचन गणांसाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सरासरी 69.76 टक्के इतके मतदान झाले. या मतदानाची मतमोजणी सोमवार, दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्ह्यात एकूण 191 टेबलवर 122 फेऱ्यांमध्ये होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
मतमोजणीसाठी तालुकानिहाय टेबल संख्या व फेऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे
आटपाडी – 18 टेबल, 12 फेऱ्या, जत – 27 टेबल, 13 फेऱ्या, खानापूर – 16 टेबल, 9 फेऱ्या, कडेगाव – 16 टेबल, 11 फेऱ्या, तासगाव – 20 टेबल, 12 फेऱ्या, कवठेमहांकाळ – 16 टेबल, 9 फेऱ्या, पलूस – 14 टेबल, 9 फेऱ्या, वाळवा – 22 टेबल, 19 फेऱ्या, शिराळा – 20 टेबल, 9 फेऱ्या, मिरज – 22 टेबल, 19 फेऱ्या.
हेही वाचा : जि.प. निकालाआधी राजकीय तापमान वाढलं; दावे-प्रतिदावे…
तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाण पुढीलप्रमाणे –
आटपाडी – पहिला मजला हॉल नवीन प्रशासकीय इमारत, तहसिलदार कार्यालय, आटपाडी.
जत – जुने शासकीय धान्य गोदाम क्र. 2, नवीन प्रशासकीय इमारत, जत तहसिल कार्यालयाच्या समोर, जत.
खानापूर – इनडोअर स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर (Indoor Sports facility centre), बळवंत कॉलेज विटा.
कडेगाव – औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), कडेगाव, कराड कडेगाव रोड, कडेगाव.
तासगाव – शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तासगाव, दत्तमाळ.
कवठेमहांकाळ – पुरवठा शाखा समोरील मोकळी जागा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कवठेमहांकाळ.
पलूस – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, दिवाणी न्यायालयाजवळ, पलूस.
वाळवा – शासकीय धान्य गोदाम, बहे रोड, ईश्वरपूर.
शिराळा – श्री गोरक्षनाथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिराळा.
मिरज – शासकीय नवीन धान्य गोदाम, मिरज, वैरण बाजार, मिरज.












































































