Last Updated on 05 Feb 2026 6:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
भाजपाचे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर घाव घालत आहे. आपल्या देशात येणाऱ्या अमेरिकन शेतीमालावर शून्य कर,मात्र आपल्या देशातील शेतीमाल त्यांच्या देशात पाठवायचा असेल,तर १८ टक्के कर भरावा लागणार आहे. यामुळे आपल्या देशातील शेती आणि शेतकऱ्यां च्यासमोर गंभीर संकट उभा रहाणार आहे.म्हणूनच आपल्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठणाऱ्या सत्ताधारी पक्षांना या निवडणुकीत जागा दाखवून द्या,असे आवाहन माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी वाटेगाव येथील जाहीर सभेत बोलताना केले.
ज्यांनी माझ्याजवळ बसून शेती व शेतकऱ्यांच्या हिताची,आणि जातीयवादी पक्षाच्या विरोधात भाषणे केली,त्यांनी विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी उभा रहावे,असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते. केदारगावचे आनंदराव तांबवे, विजय तांबवे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार श्रीमती संध्याताई पाटील,पंचायत समितीचे उमेदवार प्रकाश पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच नंदाताई चौगुले,माजी सभापती शुभांगी पाटील,माजी सरपंच राहुल चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.जयंतराव पाटील पुढे म्हणाले,या भागा मध्ये सहकारी पाणीपुरवठा संस्था निर्माण करून काळ्या आईला हिरवा शालू घालण्याचे स्वप्न आपण सर्वांनी पूर्ण केले. जो शेतकऱ्यांच्यावरती चुकीचा करार लादला जात आहे,त्या कराराला एकसंघपणे विरोध करावा लागेल. स्थानिक स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या तुतारी या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने जेंव्हा मंत्री मंडळात काम करण्याची संधी मिळाली, तेंव्हा तालुक्याच्या,जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना दिली आहे.
देवराज पाटील म्हणाले,मी अजून कासेगावात राहतो. मात्र वाटेगाव हेही माझे गांव असल्याचे समजून काम करत आहे. आपले एखादे काम झाले नाही,तर लगेच पात सोडायची नसते. ज्याचे काम होत आहे,ते करायचे हा आमच्यावरचा संस्कार आहे.
वाटेगाव सरपंच सरपंच नंदाताई चौगुले,माजी सरपंच राहुल चव्हाण,रेठरे धरणचे सरपंच हर्षवर्धन पाटील,दिलीप कापसे,शिवाजंली पाटील, किरण नांगरे,अधिकराव पाटील,प्रकाश पाटील, शंकर पवार,प्रविण चव्हाण यांची ही भाषणे झाली.
याप्रसंगी माजी सरपंच सुरेश साठे,उपसरपंच धनाजी इंगळे,प्रदीप चव्हाण,योगेश पाटील, प्रदीप देशमुख,दिनेश जाधव,संदीप साठे,प्रकाश सावंत, कृष्णात पाटील,शामराव पाटील,राजेंद्र पाटील, दादासाहेब पाटील,शिवाजी सावंत,धनाजी इंगळे,संजय केसरे,संदीप यादव,काकासो चव्हाण, सिध्दार्थ मोहिते यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी,तसेच मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.














































































