Last Updated on 04 Feb 2026 3:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
बोरगाव गावाने नेहमी जाती-पाती,आणि धर्माच्या पलीकडे जाऊन पुरोगामी जपला आहे. आपण सर्वजण एकसंघ ताकदीने कामाला लागला आहात, त्यामुळे या मतदारसंघात यश निश्चित आहे. आपणास आताच्यापेक्षा दुप्पट सेवा मिळेल, हा माझा शब्द आहे,असा विश्वास माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी बोरगाव (ता. वाळवा) येथे बोरगाव जिल्हा परिषद मतदारसंघा तील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला. आम्ही खऱ्या अर्थाने शिव-शाहू-फुले- आंबेडकर यांचे विचार जपण्याचे काम करत आहोत. आपण काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी आघाडी केली आहे. मात्र या मतदारसंघात समोरच्या बाजूने इतर पक्षांची मदत घेऊन वेगळी गणिते मांडली जात आहेत, त्या पासून सावध रहा,असा इशाराही त्यांनी दिला.
राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, महानंदचे माजी अध्यक्ष विनायक पाटील, जेष्ठ नेते विष्णुपंत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, राजाराम बापू बँकेचे उपाध्यक्ष माणिकराव पाटील, जि.प. उमेदवार सौ.कांता शिवाजी वाटेगावकर, पं.स.च्या उमेदवार सौ.रुपाली सपाटे, मनोज पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी दिग्विजय अजित शिंदे, जयदीप शिंदे, प्रणव शिंदे, पृथ्वीराज शिंदे, अजित डांगे, श्रीतेज शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
आ.पाटील म्हणाले, तुम्ही चिंता करू नका, थोड्याच दिवसात तुम्हाला बदल दिसून येतील. शिक्षणापासून पोलीस स्टेशनपर्यंत चौबाजूने सेवा मिळेल. गेल्या दोन-तीन निवडणुकांचा अनुभव वेगळा असल्याने मी शिवाजी महाराज यांना आपल्या सर्वांच्या वतीने कोणतीही अडचण येणार नाही,असा शब्द दिला आहे. आपण उरुण ईश्वरपूर या तालुक्याच्या शहरात अहिल्यादेवी होळकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभारत आहोत. यावेळी त्यांनी जिल्ह्यात राबविलेल्या मॉडेल स्कुल,स्मार्ट पीएचसी आदी उपक्रमासह आघाडी शासनातील मंत्री पदाच्या काळात जिल्ह्यात आणलेल्या निधीची यादीच वाचून दाखविली.
विजयराव पाटील म्हणाले, बोरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आणि वाळवा तालुका आ. जयंतराव पाटील यांच्या पाठीशी उभा आहे, हे या निवडणुकीत दाखवून द्या. यावेळी उमेदवार सौ. कांता वाटेगावकर,रुपाली सपाटे,मनोज पाटील यांनी मतांचा आशिर्वाद देण्याचे आवाहन केले.
महानंदचे माजी अध्यक्ष विनायक पाटील, ‘राजारामबापू’चे संचालक विठ्ठल पाटील,कृष्णेचे माजी संचालक उदय शिंदे,सर्जेराव देशमुख, अशोक जाधव, ग्रामपंचायत सदस्या सविता पाटील,अरुणा पाटील यांचीही भाषणे झाली.
शामराव वाटेगावकर,कार्तिक पाटील,अभिजित पाटील,शिवाजी वाटेगावकर,धैर्यशील पाटील, नगरसेविका शुभांगी शेळके,सुहास पाटील,धनाजी पाटील,राहुल पाटील,संतोष दमामे,शिवाजी पाटील,अविनाश खरात,अनिल खरात,जीवन कदम,काकासाहेब यादव,रघुनाथ साळुंखे,सर्जेराव कदम,संजय कदम,जयवंत पाटील,शशिकांत साटपे पै.विकास पाटील,पै.विलास शिंदे,तानाजी पाटील,लालासाहेब वाटेगावकर,सचिन देसाई यांच्यासह बोरगाव व मतदारसंघातील विविध गावातील पदाधिकारी,कार्यकर्ते व मतदार मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रवादी सेवा दलाचे तालुकाध्यक्ष संभाजी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अरुण पाटील यांनी आभार मानले.














































































