तहसीलदार सचिन पाटील यांची पदोन्नतीने पुणे येथे बदली
सांगली । वाळवा-ईश्वरपूरचे तहसीलदार सचिन पाटील यांची पुणे येथे उपजिहाधिकारी पदी पदोन्नतीने बदली झाली असून आता सारिका रासकर या वाळवा-ईश्वरपूरच्या नव्या तहसीलदार असणार आहेत.
महसूल खात्याने नायब तहसीलदार, तहसीलदारांना पदोन्नती देण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या पदोन्नती व बदल्या करण्यात आल्या आहेत.
नूतन तहसीलदार सारिका रासकर यांची पदोन्नतीने वाळवा-ईश्वरपूरच्या तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे. तहसीलदार रासकर यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालय तसेच रामटेक व सावनेर येथे नायब तहसीलदार म्हणून आपल्या सेवा बजावल्या आहेत.
हेही वाचा – तहसीलदार सचिन पाटील यांना उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती
प्रशासकीय कामाची त्यांची पद्धत आणि ई-फेरफारसारख्या आधुनिक महसुली प्रणालीच्या प्रशिक्षणातील सहभाग यामुळे महसूल विभागात त्यांची ओळख एक कार्यक्षम अधिकारी म्हणून आहे. सद्या त्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या.
तहसीलदार म्हणून वाळवा-ईश्वरपूर तालुक्याच्या प्रशासनाची आणि महसुलाची प्रमुख जबाबदारी आता त्यांच्यावर असणार आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा तालुक्याच्या विकासाला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा : सांगली । आजच्या युगात मुले संवेदनाशून्य होत चाललेली आहेत.त्यांच्यावर वेळीच योग्य ते संस्कार होणे गरजेचे आहे. आपणही कधीतरी वृध्द होणार आहोत याची जाणीव होणे आवश्यक आहे.त्यासाठी... Read more











































































