सांगली । वाळवा तालुक्याचे तहसीलदार सचिन पाटील यांना उप जिल्हाधिकारी पदी पदोन्नती मिळाली आहे.
कर्तव्यनिष्ठ, लोकाभिमुख आणि संयमी अधिकारी म्हणून परिचित असलेल्या सचिन पाटील यांची पदोन्नतीने उप जिल्हाधिकारी भूसंपादन क्र. १९, पुणे येथे बदली झाली आहे.
प्रशासनात कार्यक्षम, संयमी व लोकाभिमुख अधिकारी म्हणून सचिन पाटील यांनी वाळवा तालुक्यात कार्यरत असताना अनेक प्रशंसनीय कामगिरी बजावली. नागरिकांच्या अडचणींना संवेदनशीलतेने हाताळणे, शेतकरीवर्गाच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आणि कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता राखणे ही त्यांची कार्यशैली ठरली आहे.
‘अधोरेखित’तर्फे सचिन पाटील यांना त्यांच्या या नवीन जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!









































































