Last Updated on 14 Nov 2025 10:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
रविवारी सुट्टीच्या दिवशीही अर्ज स्वीकारले जाणार
पुणे । राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे आता ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेही सादर करता येणार आहेत. संगणक प्रणालीत अडचणी येत असल्याने आणि उमेदवारांना समान संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
दि. १५ ते १७ नोव्हेंबर २०२५ या तीन दिवसांत, रविवार सुट्टीच्या दिवशीही, दररोज सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत उमेदवारांना दोन्ही पद्धतीने नामनिर्देशनपत्रे आवश्यक कागद पत्रासह संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करता येतील.
सर्व संबंधितांनी आपल्या स्तरावरून आवश्यक सूचना निर्गमित करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.











































































