Last Updated on 06 Nov 2025 6:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांचे आवाहन
पुणे । शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) -2025 परीक्षेचे आयोजन रविवार, 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी बंगाली, कन्नड, तेलगु, गुजराती माध्यमांच्या विद्यार्थी, उमेदवारांची राज्यामध्ये एकूण संख्या कमी प्रमाणात असल्याने संबंधित सर्व विद्यार्थी, उमेदवारांचे परीक्षा केंद्र उपलब्ध करण्यात येत असून याची संबंधित सर्व विद्यार्थी, उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
टीईटी परीक्षेसंदर्भात समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये- अनुराधा ओक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार २३ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात युट्यूब चॅनल्स, विविध समाजमाध्यम तसेच प्रसार माध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in व http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना, माहितीचे अवलोकन करावे. कोणत्याही चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार सर्वस्वी जबाबदार असतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.
Post Views: 101