Last Updated on 01 Nov 2025 9:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
साखराळे व कारंदवाडी युनिट च्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी आवाहन
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुसुमताई ऊस उत्पादक प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. कारखान्याच्या सर्व गटासाठी एकूण रक्कम सात लाख रुपयांची बक्षिसे ठेवली आहेत.कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद-बिगर सभासद शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते प्रतिक पाटील यांनी केले.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे व कारंदवाडी युनिटचा गळीत हंगाम मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांच्या हस्ते साखराळे युनिटमध्ये, तर संचालक वैभव वसंतराव रकटे यांच्या हस्ते कारंदवाडी युनिट कार्यस्थळावर विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष संग्राम फडतरे, संचालक बाळासाहेब पवार, विठ्ठल पाटील, कार्तिक पाटील, प्रदीपकुमार पाटील, अमरसिंह पाटील, अतुल पाटील, दादासाहेब मोरे, रघुनाथ जाधव, बबनराव थोटे, शैलेश पाटील, रमेश हाके, रामराव पाटील, हणमंत माळी, दिलीपराव देसाई, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, कामगार नेते राजेंद्र चव्हाण, तानाजीराव खराडे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रतीक पाटील पुढे म्हणाले, आपण माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कुसुमताई ऊस उत्पादक प्रोत्साहन योजना नव्याने सुरू केली आहे. कारखान्याच्या सहा गटासह कारंदवाडी गटासाठी प्रत्येकी २५ हजाराची चार बक्षिसे ठेवली आहेत.जे ऊस उत्पादक सभासद-बिगर सभासद कारखान्या कडे आपला सर्व ऊस नोंद करून कारखान्या स घालतील त्यांना कारखान्याचे वतीने कुपन दिले जाणार आहे. हा गळीत हंगाम संपल्या नंतर १५ दिवसांनी ही सोडत केली जाणार आहे.
याप्रसंगी माजी संचालक विराज शिंदे, माजी जि.प. सदस्य संभाजी कचरे, प्रा.बाळासाहेब मासुले, कामगार प्रतिनिधी मनोहर सन्मुख, विकास पवार, बाळासाहेब लाड, तानाजी कोळी, रावसाहेब मडके, शकील मुजावर, प्रकाश सावर्डे, साखराळेचे बाबुराव पाटील, भास्कर पाटील, वसंतराव माने, पी.बी.सुर्वे, जयसिंग डांगे, रामराजे पाटील, कारखान्याचे सचिव डी.एम. पाटील, जनरल मॅनेंजर एस.डी.कोरडे, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, विजयराव मोरे, सुनिल सावंत, उमेश शेटे, संग्राम चव्हाण, महेश पाटील यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कामगार उपस्थित होते.










































































