सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे,वाटेगाव-सुरूल व कारंदवाडी युनिटकडे गळीत हंगाम सन २०२४-२५ मध्ये गाळपास आलेल्या ऊसा पोटी दिवाळी सणासाठी एकूण रुपये ८ कोटी ३७ लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शुक्रवारी वर्ग केले आल्याची माहिती राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी दिली.
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या साखर कारखान्या ने गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये १३ लाख ७२ हजार २८१ मेट्रीक टन ऊसाचे गाळप केलेले आहे. यामध्ये साखराळे युनिटमध्ये ६ लाख ७३ हजार ४३२,वाटेगांव-सुरूल युनिट मध्ये ३ लाख ९८ लाख ५९३, कारंदवाडी युनिटमध्ये ३ लाख २५५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप केलेले आहे.
साखराळे,वाटेगाव-सुरूल व कारंदवाडी युनिटकडे गाळपास आलेल्या ऊसास पहिला हप्ता प्रतिटन रुपये ३ हजार २०० प्रमाणे एकूण रक्कम रुपये ४३९ कोटी १२ लाख इतकी रक्कम ऊस बिलपोटी आदा केलेली आहे. सध्या दिवाळी सणासाठी ८ कोटी ३७ लाख रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेले आहेत.
कारखान्याच्या साखराळे,वाटेगाव-सुरूल, कारंदवाडी व तिप्पेहळळी-जत युनिटमध्ये ऑफ सिझनची कामे गतीने सुरू आहेत. चारही युनिट शासनाने निश्चित केलेल्या तारखेस सुरू करीत आहोत. आपण गळीत हंगाम सन २०२५-२६ करिता साखराळे युनिटमध्ये ९ लाख ५० हजार,वाटेगाव-सुरूल युनिटमध्ये ५ लाख ५० हजार,व कारंदवाडी युनिटमध्ये ४ लाख ५० हजार,तिप्पेहळळी-जत युनिटमध्ये ३ लाख ५० हजार असे एकूण २३ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस आपल्या कारखान्यास पाठवून सहकार्य करावे,असे आवाहन प्रतिकदादा पाटील यांनी केले आहे.
याप्रसंगी उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक देवराज पाटील,प्रदीपकुमार पाटील,कार्तिक पाटील,विठ्ठल पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,चिफ अकौंटंट संतोष खटावकर प्रामुख्याने उपस्थित होते.
Recent Posts
बातमी शेअर करा : सांगली । भाजपाचे जेष्ठ नेते, माजी नगरसेवक एल.एन.शहा, त्यांचे चिरंजीव भाजपाचे शहर उपाध्यक्ष उमेश रायगांधी यांनी माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र... Read more












































































