सांगली । राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी आरक्षण सोडत कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या कार्यक्रमानुसार सांगली जिल्हा परिषद, 61- निवडणूक विभागाच्या, जिल्हाधिकारी सांगली यांच्यास्तरावर व 10 पंचायत समितीचे, 122- निर्वाचक गणाचे संबंधित तहसिलदार यांच्यास्तरावर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांसह) आरक्षण सोडत दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. यासाठी दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता निश्चित केलेल्या ठिकाणी सभा होणार आहे. ज्या नागरिकांना या सभेस हजर राहण्याचे आहे त्यांनी संबंधित ठिकाणी विहीत वेळेत हजर रहावे, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
जिल्हा परिषद सांगली साठी एकूण 61 गट असून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे सभा होणार आहे.
पंचायत समिती निहाय एकूण गण व सभेचे ठिकाण अनुक्रमे पुढीलप्रमाणे – आटपाडी – 8 गण, पंचायत समिती आटपाडी येथील बैठक सभागृह, ता.आटपाडी, जि.सांगली. जत – 18 गण, तलाठी भवन, तहसिल कार्यालय जतच्या आवारातील. खानापूर – 8 गण, बैठक सभागृह, तिसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विटा. कडेगाव – 8 गण, बैठक सभागृह, तहसिल कार्यालय कडेगाव, पहिला मजला. तासगाव – 12 गण, शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तासगाव. कवठेमहांकाळ – 8 गण, मा. आर आर (आबा) पाटील सभागृह, पंचायत समिती कवठेमहांकाळ. पलूस – 8 गण, तहसिल कार्यालय पलूस, पहिल्या मजल्यावरील सभागृह. वाळवा – 22 गण, लोकनेते राजारामबापू नाट्यगृह इस्लामपूर. शिराळा – 8 गण, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, तहसिल कार्यालय शिराळा. मिरज – 22 गण, मा. श्री. वसंतरावदादा पाटील सभागृह, पहिला मजला, पंचायत समिती मिरज.
वरील नमूद सभेच्या ठिकाणी दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सभा होणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.









































































