Last Updated on 22 Sep 2025 7:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । नेर्ले (ता. वाळवा) येथील महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल संघटनेचे अध्यक्ष, गौरव समितीचे सदस्य, दैनिक पुढारीचे पत्रकार राजेंद्र वसंतराव पाटील (वय ५८) यांचे सोमवारी निधन झाले.
कासेगाव शिक्षण संस्थेच्या वाटेगाव हायस्कूल, वाटेगाव या ठिकाणी ते ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दिनांक २४ रोजी सदा पाटील मळा नेर्ले येथे आहे.
मनमिळावू व्यक्तिमत्व हरपले
सदैव लोकांसाठी झटणारा, सुसंस्कृत चेहरा तसेच राजकारण, समाजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. राजेंद्र पाटील यांच्या रूपाने मनमिळावू आणि दिलदार व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेले. त्यांच्या जाण्याने परिसराची अपरिमित हानी झाली आहे. ही झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. त्यांना ‘अधोरेखित’ परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!










































































