Last Updated on 13 Sep 2025 12:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या मतदार याद्या तयारीच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर! केले आहे. भारत निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०२५ या पात्रता दिनांकास अनुसरून मतदार यादी नव्याने तयार करण्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
निवडणुका २०२६ मधील नियमित रिक्त जागा भरण्यासाठी होणार असून, औरंगाबाद, पुणे, नागपूर, अमरावती – पदवीधर मतदारसंघ तसेच पुणे, अमरावती – शिक्षक मतदारसंघांमध्ये नव्याने मतदार यादी तयार केली जाणार आहे.













































































