Last Updated on 08 Jul 2025 10:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ३५ शेतकरी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे येथे आयोजित ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे प्रतिएकरी उत्पादनवाढीसाठी शेतकर्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटतर्फे दरवर्षी प्रशिक्षण दिले जाते. या शिबीरात सहभागी होण्याची संधी कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील ३५ शेतकर्यांना उपलब्ध करून दिली आहे.
संचालक जितेंद्र पाटील, विलास भंडारे, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील यांनी सहभागी होणार्या शेतकर्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सेक्रेटरी सिद्धेश्वर शिलवंत, जनरल मॅनेजर (केन ) दादासाहेब शेळके, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, एच. आर. मॅनेजर संदीप भोसले, सिनिअर सिव्हिल इंजिनिअर जयवंत शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल निकम, संरक्षण अधिकारी संजय नलवडे, डॉ. विजय कुंभार, सहाय्यक शेती अधिकारी अजय दुपटे, सहाय्यक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर यांच्यासह सर्व अधिकारी, सर्कल ऑफिसर, शेती मदतनीस व कर्मचारी उपस्थित होते.
या पाच दिवसीय प्रशिक्षण शिबीरात राज्यातील हजारो शेतकरी सहभागी होत असतात. शिबीरात माती परीक्षण, अधिक ऊस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपे, बियाणे मळा, रोग व कीड नियंत्रण व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 06 Nov 2026 9:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधील पदसंख्येत मोठ... Read more












































































