Last Updated on 03 Jul 2025 3:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी ही योजना राबविण्यात येत असून सोमवारी, ७ जुलै रोजी बहे सोसायटीच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यावेळी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार सचिन पाटील तसेच अन्य अधिकारी उपस्थित असणार आहेत.
सदर शिबिरामध्ये सलोखा योजना, लक्ष्मी मुक्ती, पाणंद रस्ते, वारस नोंदी, एकत्र कुटुंब मॅनेजर शेरा कमी करणे, अपाक शेरा कमी करणे, पोटखराब क्षेत्र वहिवाटीखाली घेणे, जातीचे व इतर सर्व प्रकारचे दाखले सदर योजनेचे अर्ज स्वीकारून त्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे
तरी बहे महसूल मंडळातील बहे, हुबालवाडी, खरातवाडी, शिरटे, कोळे, नरसिंहपूर, तांबवे या गावातील सर्व ग्रामस्थांनी एक दिवसीय शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळ अधिकारी उषा गवळे, बहेचे ग्राम महसूल अधिकारी गणेश हुबाले, हुबालवाडी, खरातवाडीचे तुषार गुरव, कोळे, नरसिंहपूरचे लहूदास चौधरी, तांबवेचे विशाल कदम, शिरटेच्या सोनाली चव्हाण व सर्व महसूल सेवक कर्मचारी आदींनी केले आहे.











































































