Last Updated on 17 Jun 2025 7:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
हिंगोली । जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या संकल्पनेतून व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड यांच्या नेतृत्वात हिंगोली जिल्ह्यातील 563 ग्रामपंचायतीच्या इमारती एक रंगात करण्याच्या कामास मागील आठवड्यात सुरुवात झाली आहे.
सर्व ग्रामपंचायत इमारतीत स्वतंत्र शौचालय, बैठक व्यवस्था, संगणक संच, पिण्यासाठी पाणी, नियमित स्वच्छता, ऑफिससाठी खुर्ची, टेबल, अभ्यांगतासाठी स्वतंत्र खुर्च्या, प्रिंटर, वायफाय, इन्व्हर्टर इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत सर्व गटविकास अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सर्व गटविकास अधिकारी यांनी तालुकास्तरावर सर्व ग्रामसेवक (ग्राम पंचायत अधिकारी) यांच्या बैठका घेऊन नियोजन केले आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी 15 वा वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायत स्तरावर खर्च करावयाचा आहे.
याबाबत दर आठवड्याला गटविकास अधिकारी यांचा आढावा घेऊन कामास गती देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी दिले आहेत. या उपक्रमासाठी विष्णू भोजे यांना जिल्ह्याचे समन्वयक म्हणून नेमण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेने दिली आहे.
स्रोत : जिमाका, हिंगोली
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 11 Mar 2026 8:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत माहिती मुंबई । प्रवाशांना सक्षम प्रवासी सेवा देण्यासाठी राज्य परिवहन महा... Read more












































































