महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – २०२३ ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर
सांगली । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ च्या अर्हता प्राप्त उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. इस्लामपूर येथील योगेश अजित पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिकी सेवा परीक्षेतून राज्यात ३१ वा क्रमांक मिळविला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये सहाय्यक अभियंता (क्लासवन) पदावर त्याची निवड झाली आहे.
सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्याची स्पर्धा परीक्षांमधून नगर चना विभागात नगररचना सहायक वर्ग २ या पदावर निवड होऊन ते कार्यरत झाले होते. त्यांचे माध्यमिक शिक्षण कासेगाव शिक्षण संस्थेच्या विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल साखराळे येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी इस्लामपूर येथील विद्या मंदिर ज्युनिअर कॉलेजमध्ये घेतले. पदवीचे शिक्षण घेताना त्यानी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे येथून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी संपादन केली.
ते सध्या आयआयटी पवई येथे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये बहिस्थ विद्यार्थी म्हणून देखील अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळाकडील कार्यकारी अभियंता अजित पाटील यांचा तो मुलगा आहे. तर त्यात्यांची बहीण अस्मिता स्वप्नील पाटील याही बांधकाम विभागात सहाय्य्यक अभियंता म्हणून कोल्हापूर येथे कार्यरत आहेत.
या यशाबद्दल त्याचे ‘अधोरेखित’ परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन!