सांगली । गेल्या अनेक वर्षापासुन इस्लामपुर येथील प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर च्या माध्यमातुन वैद्यकीय सेवेचे कार्य सुरु आहे.प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर हे अनेक गरजु रुग्णांना वरदान ठरत आहे,कोल्हापुर,पुणे,मुंबई बरोबरच्या सेवासुविधांचे दालन सुरु करताना या हाॅस्पिटल मध्ये नुकतीच ६५ वर्षीय महीला रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत पहीली ओपन हार्ट सर्जरी यशस्वीरित्या करण्यात आली. ही सर्जरी प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरचे ह्रदयविकार तज्ञ डाॅ.प्रविण सांळुखे यांनी केली.
सदरच्या महिला रुग्णाला धाप लागत असल्याने प्रकाश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आले असता 2D ECHO करण्यात आला त्यामध्ये झडप बंद झाले असल्याचे दिसुन आले. त्या महिला रुग्णावर प्रकाश हॉस्पिटलमध्ये झडप बदलण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. इतर खाजगी हॉस्पिटलमध्ये तीन ते चार लाख रुपये खर्च केल्यानंतर होणारे उपचार व शस्त्रक्रिया प्रकाश हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आली आहे.
इस्लामपुर सारख्या निमशहरात प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मध्ये अत्याधुनिक सुविधाची उपलब्दता असुन तज्ञ व अनुभवी डाॅक्टरांच्या माध्यमातुन रुग्णसेवा दिली जाते,अनेक योजनेअंतर्गत रुग्णांच्यावर मोफत उपचार होत आहेत,तज्ञ डाॅक्टर व अत्याधुनिक सेवासुविधेमुळे वाळवा, शिराळा,पलुस कडेगांव तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील रुग्णांना प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर हे वरदान ठरत आहे.
इस्लामपुर सारख्या निमशहरात ओपन हार्ट सारख्या सर्जरी होऊ लागल्याने या परीसरातील रुग्णांना कोल्हापुर,पुणे,मुंबई सारख्या शहराकडे उपचारासाठी धाव घ्यावी लागणार नाही,यामुळे रुग्ण व नातेवाईक यांचा वेळ व पैसा बचत होणार आहे.
प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मध्ये ६५ वर्षीय महिला रुग्णावर झालेल्या शस्त्रक्रियेला चार तासाचा वेळ लागला असुन त्या रुग्णांची प्रकृती चांगली आहे,लवकरच सदर रुग्णास डिस्चार्ज देण्यात येणार आहे.यशस्वी शस्त्रक्रीयेबद्दल ह्रदयविकार तज्ञ डाॅ. प्रविण साळुंखे व त्यांच्या टीम चे प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर चे संस्थापक निशिकांत भोसले- पाटील (दादा)यांनी अभिनंदन केले.
प्रकाश हाॅस्पिटल मधील मोफत सुविधा
▪️Sonography, x-ray, CT scan, MRI, ECG, Mammography.
▪️बेसिक रक्तचाचण्या मोफत राहतील.
▪️नॉर्मल व सिझेरियन डिलिव्हरी औषधांसहित पुर्णतः मोफत होतात.
▪️गर्भाशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया औषधांसहित मोफत करण्यात येतील.
▪️ Varicose veins सारख्या आजारांवरील उपचार देखील प्रकाश हॉस्पिटलमध्ये केले जातात.