सांगली । माणुसकीचं नातं प्रतिष्ठान, इस्लामपूर यांच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त गुरुवार, १ मे २०२५ रोजी भव्य ‘महा रक्तदान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत सर्जेराव यादव मल्टीपर्पज हॉल, एमआयडीसी, बहे रोड, इस्लामपूर येथे पार पडणार आहे.
हा उपक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणावर राबवला जात असून, गेल्या चार वर्षांत उल्लेखनीय रक्तसंकलन झाले आहे. रक्तदात्यांचा वाढता सहभाग ही या शिबिराची जमेची बाजू आहे.
पुर्वीचे रक्तसंकलन उच्चांक :
१ मे २०२१ – ६६२ युनिट्स
१ मे २०२२ – ९०५ युनिट्स
१ मे २०२३ – ९१४ युनिट्स
१ मे २०२४ – ६३० युनिट्स
या वर्षी २०२५ मध्ये, या संख्येला मागे टाकण्याचा निर्धार प्रतिष्ठानने केला आहे. ‘रक्तदान करूया, माणुसकीचं नातं जपूया’ या प्रेरणादायी संदेशासोबत इस्लामपूरकरांनी यंदाही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रक्त दानासाठी प्राधान्य नोंदणीसाठी संपर्क:
9195069999
९८२३८३३८८८
९८२२३७४७५९
९८८१६५८०३३