Last Updated on 13 Apr 2025 1:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बहे येथील पवित्र तीर्थक्षेत्र श्रीरामलिंग बेटावर शनिवारी सायंकाळी महाआरतीच्या वेळी भक्तिभावाचा ओसंडून वाहणारा माहोल अनुभवायला मिळाला. सांगली येथील ॲड. प्रितेश खराडे आणि त्यांच्या पत्नी सौ. निकिता खराडे यांच्या हस्ते अत्यंत भक्तिभावाने आणि शिस्तबद्ध वातावरणात आरती पार पडली.
मंदिर परिसर अगोदरच सजवण्यात आला होता. दिव्यांच्या मंद प्रकाशात आरतीचा क्षण अत्यंत भारावलेला होता. शेकडो भाविक उपस्थित राहून आरतीच्या मंगल क्षणाचा अनुभव घेत होते.
यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजन देवस्थान समिती व बडवे परिवाराने केले होते.
रामलिंग बेटावरील धार्मिक परंपरा आणि भक्तीचा हा वारसा, अशा धार्मिक उपक्रमांमुळे अधिक सशक्त होत असून, भाविकांच्या सहभागातून या पवित्र स्थळाचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व अधिक वृद्धिंगत होत आहे.













































































