सांगली : सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई यांचा जे जे ॲवॉर्ड बेस्ट आर्ट वर्क हा सन २०२४-२५ चा पुरस्कार फार्णेवाडी (ता. वाळवा) येथील आदर्श सुनील फार्णे यांना देण्यात आला आहे.
शिल्पकला व मॉडेलिंग क्षेत्रात आदर्श यांने अगदी कमी वयात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांने निर्माण केलेल्या मानवी शिल्पातून आजच्या समाजातील मानवी वृत्तीचे चित्र रेखाटले आहे यामध्ये आजचा माणूस आपल्याला जे हवे आहे त्याच्या मागे लागतो पण आजूबाजूला असणारे जग त्याला दिसत नाही. डोळे उघडे ठेऊन ही तो आंधळा होतो ही भावना रेखाटली आहे. त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.