Last Updated on 09 Mar 2025 2:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये लाभार्थी महिलांना मिळण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितली आहे. ७ मार्च २०२५ पासून फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून १२ मार्च २०२५ पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचंही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.
ही प्रक्रिया दिनांक १२ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये व मार्च महिन्याचे १५०० रुपये असे दोन टप्प्यात एकूण ३००० रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असल्याचंही मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्त्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे की, “लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया ७ मार्च २०२५ पासून सुरू झालेली आहे. ही प्रक्रिया १२ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये व मार्च महिन्याचे १५०० रुपये असे दोन टप्प्यात एकूण ३००० रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावं”, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 06 Nov 2026 9:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधील पदसंख्येत मोठ... Read more












































































