मुंबई : माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. तर विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गेले अनेक महिने राज्यात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा होती. अखेर आज ही निवड करण्यात आली आहे. सकपाळ यांच्यावर यापूर्वी पक्ष निरिक्षक म्हणून ओडिसा लोकसभा, विधानसभेची जबाबदारी देण्यात आली होती. याशिवाय त्यांनी राष्ट्रीय सचिव या पदावर काम केले असून नवी दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब राज्याचे सह प्रभारी म्हणून काम पाहिले आहे.
बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते बुलडाणा मतदारसंघातून निवडून आले होते. एकविसाव्या शतकातील वैश्विक मित्रता अभियान अंतर्गत जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशनच्यावतीने १९९६ मध्ये जपानमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय युवा परिषदेसाठी त्यांनी २० भारतीय युवक प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले होते.
साभार : प्रसार भारती