Last Updated on 31 Jan 2025 7:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गुण पडताळणी अथवा त्रुटी, आक्षेप असल्यास 6 फेब्रुवारी पर्यंत संकेतस्थळावर नोंदवावी
हिंगोली | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. 10 नोव्हेंबर, 2024 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024 पेपर क्र. 1 (इयत्ता पहिली ते पाचवी), पेपर क्र. 2 (इयत्ता सहावी ते आठवी) चा अंतरिम निकाल परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
पेपर एक व पेपर दोन साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दि. 31 जानेवारी, 2025 रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल. या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी, आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर दि. 1 फेब्रुवारी ते दि. 6 फेब्रुवारी, 2025 पर्यंत उमेदवारांच्या लॉग इनमधून ऑनलाईन पध्दतीने नोंदविता येईल. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दि. 6 फेब्रुवारी, 2025 पर्यंत mahatet24.msce@gmail.com या ई-मेलवर पाठवावे. यानंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे अनुराधा ढोक, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
अधिकृत वेबसाईटवर निकाल पहा प्रसिद्धीपत्रक maha tet result link














































































