Last Updated on 05 Jan 2025 3:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या तिप्पेहळळी-जत युनिटकडे गळीत हंगाम सन २०२४-२५ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसास प्रतिटन रुपये ३ हजार दर आदा करणार असल्याची माहिती कारखान्या चे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिली.
श्री.पाटील पुढे म्हणाले,गळीत हंगाम सन २०२४-२५ मध्ये आजअखेर १ लाख १० हजार ३०० मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले असून १ लाख १३ हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा १०.३० इतका मिळाला आहे.
कारखाना व्यवस्थापनाने गळीत हंगाम सन २०२४-२५ करिता जत युनिटसाठी ३ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून आम्ही सर्वांच्या सहकार्याने हे उद्दिष्ट पूर्ण करू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे,असे शेवटी आवाहनही केले आहे.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, संचालक देवराज पाटील, प्रदीपकुमार पाटील, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, कार्यकारी संचालक आर.डी माहूली, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, हणमंत दरीगोंडा, चीफ अकौंटंट संतोष खटावकर उपस्थित होते.









































































