Last Updated on 31 Dec 2024 4:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये होणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे. त्यानंतर आता अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या एमएचटी-सीईटीचीविद्यार्थी नोंदणीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे
सीईटी सेलकडून पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या एकूण १९ प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्यासाठीचे संभाव्य वेळापत्रक सीईटी सेलने उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार सीईटी परीक्षा मार्चपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांसाठीची नोंदणी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी, शिक्षणशास्त्र-शारीरिक शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमएड आणि एमपीएड), तीन वर्षे विधी अभ्याससक्रम अशा काही अभ्यासक्रमांच्या सीईटीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सीईटी सेलच्या नियोजानुसार अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषि पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची एमएचटी-सीईटी ९ ते २७ एप्रिल या कालावधीत घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठीची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ३० डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. अधिक माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी अर्ज खालील नमूद वेळापत्रकाप्रमाणे सादर करावायचे आहेत.
संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे : दिनांक ३०/१२/२०२४ ते दिनांक १५/०२/२०२५
विलंब शुल्क भरून ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे : दिनांक १६/०२/२०२५ ते दिनांक २२/०२/२०२५
(अतिरीक्त विलंब शुल्कासह रु. ५००/- सर्व प्रवर्गाकरीता)
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक : दिनांक २३/०२/२०२५
संकेतस्थळ – www.mahacet.org
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 09 May 2026 8:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा महत्वपूर्ण निर्णय कामगार वर्गात समाधानाचे वातावरण कराड । रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्य... Read more
















































































