कोल्हापूर | महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या जी.डी.सी.ॲण्ड ए व सी.एच.एम. ची परीक्षा मे २०२४ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून हा निकाल https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांना लॉगईन व पासवर्ड वापरुन पाहता येईल. तसेच https://sahakaraayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर “महत्वाचे दुवे मधील जी.डी.सी.ॲण्ड ए मंडळ” येथे पहावयास मिळेल. अशी माहिती केंद्र प्रमुख जी डी सी ॲण्ड ए परीक्षा कोल्हापूर केंद्र तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेचे निलकंठ करी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
फेरगुण मोजणी करीता परीक्षार्थ्यांनी दिनांक ४ डिसेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ पर्यंत (रात्री २२.३०) पर्यंत https://gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवर परीक्षार्थ्यांना लॉगइन व पासवर्ड वापर करुन अर्ज करता येईल. फेरगुण मोजणी करीता शुल्क भारतीय स्टेट बँक (SBI) च्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी ७५ रुपये अधिक बँक चार्जेस इतकी फी असून चलन ऑनलाईन प्राप्त करून घेण्याची मुदत दिनांक ५ जानेवारी २०२५ पर्यंत (रात्री २२.३०) राहील. सदरचे चलन बँकेत दिनांक ८ जानेवारी २०२५ पर्यंत (बँकेचे कामकाजाचे वेळेत) भरण्यात यावे. विहित तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर विचार होणार नाही. असेही प्रसिध्दी पत्रकात नमूद आहे.