Last Updated on 21 Dec 2024 8:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नागपूर | विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. 3 मार्च 2025 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली.
विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज
विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 7 तास 44 मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 87.80 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही 72.90 टक्के इतकी होती.
विधानसभेत पुर्न:स्थापित 15 शासकीय विधेयके मांडण्यात आली असून 13 विधेयके संमत झाली. संयुक्त समितीकडे एक विधेयक, प्रलंबित एक विधेयक. विधानपरिषदेने संमत केलेली 4 विधेयक विधानसभेत संमत करण्यात आली. तसेच सभागृहात नियम 293 अन्वये एकूण प्राप्त सूचना 1 असून 1 सूचना मान्य करण्यात आल्या. अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 20 Apr 2026 11:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit २० ते २४ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा मुंबई । भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी... Read more
विधानपरिषद
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार, दि. 3 मार्च 2025 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी केली.
विधानपरिषदेत प्रत्यक्षात 36 तास कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 6 तास झाले. या अधिवेशनात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 87.76 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही 79.30 टक्के इतकी होती.
विधानपरिषदेत पुर्न:स्थापित 4 शासकीय विधेयके मांडण्यात आली असून 4 विधेयके संमत झाली. विधानसभेने परित करून विधानपरिषदेत आलेली विधेयके 9 आहेत. यामध्ये शिफारशी शिवाय विधानसभेला परत पाठवलेली विधेयके 4 आहेत. परिषदेत 4 शोक प्रस्ताव मांडण्यात आले. अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल सभापती प्रा शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.














































































