Last Updated on 18 Dec 2024 9:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी प्रवासी बोटीला दुर्घटना झाल्याची घटना घडली. गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला निघालेल्या नीलकमल बोटीला उरण इथं झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 10 प्रवासी असून 3 जण नौदल कर्मचारी आहेत. मृतांच्या नातेवाइकांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी नागपूरमध्ये सांगितले.
दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी हा अपघात झाला. त्यातील 10 जण सामान्य नागरिक आहेत तर 3 जण हे नौदलातील असल्याचे समजते.सुमारे 101 जणांना वाचविण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सायंकाळी प्राथमिक माहिती दिली होती. यावेळी नौदल किंवा तटरक्षक दलाची बोट बहुधा चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अतिशय वेगाने प्रवासी बोटीला धडकल्याचं व्हिडिओत दिसत असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं होतं. मदत वेळेवर पोहोचल्यानं बहुतेकांना वाचवण्यात यश आल्याचं सांगून अपघातात प्राण गमावलेल्या आणि जखमी झालेल्यांना शासनातर्फे योग्य मदत देण्याचं आश्वासनही फडणवीस यांनी विधानसभेत सायंकाळी दिलं. दरम्यान, सायंकाळी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार या बोटीत एकंदर ११० जण होते. यापैकी दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर चौघांची प्रकृती गंभीर आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 06 Nov 2026 9:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधील पदसंख्येत मोठ... Read more
अपघातातल्या जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत या दुर्घटनेसंदर्भात विधानपरिषदेत सांगितले की मुंबईत घडलेली घटना ही दुर्दैवी असून या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना वैद्यकिय सहायता तात्काळ देण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
नौदल,JNPT, स्थानीय बोटितील नागरीक, कोस्ट गार्ड, स्थानिक पोलीस, मेरीटीयम बोर्ड चे कर्मचारी, स्थानीय नागरीकांनी तात्काळ एकत्र येऊन एक टीम वर्क केल्यामुळे आणि बचावकार्य तात्काळ सूरू केल्याने मोठी जीवितहानी टाळता आली.. त्यामूळे बचावकार्य तात्काळ सूरू करून प्रवाशांना वाचविनाऱ्यांचे एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत आभार मानले. या दुर्घटनेचा तपास पोलीस प्रशासन आणि नौदलाद्वारा करण्यात येणार आहे.












































































