मुंबई । भारतीय आयटी उद्योगासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. २०२४ च्या उत्तरार्धात देशातील आयटी क्षेत्रात तेजी दिसून येत आहे. मानव संसाधन कंपनी NLB सर्व्हिसेसच्या अहवालानुसार, पुढील वर्षी म्हणजे २०२५ मध्ये या क्षेत्रातील फ्रेशर्सच्या भरतीमध्ये लक्षणीय वाढ होईल. आयटी क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी २० टक्क्यांनी वाढू शकतात.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशीन लर्निंग (ML), डेटा ॲनालिटिक्स, क्लाउड आणि सायबर सिक्युरिटी यासारख्या विशिष्ट तांत्रिक भूमिकांची मागणी ३० ते ३५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
कंपनीचे म्हणणे आहे की, २०२५ पर्यंत आयटी फ्रेशर्सच्या भरतीमध्ये मोठी वाढ होईल. ही वाढ विशेषत: ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC), उत्पादन, BFSI, आरोग्यसेवा आणि किरकोळ क्षेत्रात असेल. या भागातही फ्रेशर्सची भरती ३०-३५ टक्क्यांनी वाढू शकते.
NLB सेवांचे हे विश्लेषण सध्याच्या उद्योग कल आणि मागणीच्या आधारे तयार केले गेले आहे. २०२४-२५ च्या दुसऱ्या सहामाहीत कॅम्पस हायरिंगमध्येही लक्षणीय वाढ होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.
Courtesy: Prasar Bharati