Last Updated on 05 Dec 2024 2:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । नाशिक जिल्ह्यात वातावरण ढगाळ असून मध्यरात्री जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात उद्यापर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.
तर रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे.
साभार : प्रसार भारती









































































