Last Updated on 22 Nov 2024 4:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे | पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये सीएनजी दरवाढ गुरुवारी मध्यरात्रीपासून प्रतिकिलो दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) पुणे, पिंपरी-चिचवडसह चाकण, तळेगाव हिंजवडमध्ये सीएनजीचा पुरवठा केला जातो.
कंपनीने गुरुवारी मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो दोन रुपये वाढ केली. यामुळे सीएनजीचा दर प्रतिकिलो ८७.९० रुपयांवर गेला आहे. याआधी गणेशोत्सवात ८ सप्टेंबरला सीएनजीच्या दरात प्रतिकिलो ९० पैसे वाढ झाली होती. यामुळे सीएनजीचा दर प्रतिकिलो ८५.९० रुपयांवर गेला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचा दर वाढल्याने त्याची आयात महागली आहे. यामुळे कंपनीने सीएनजीच्या दरात वाढ करण्याचे पाऊल उचलले आहे.









































































