Last Updated on 20 Nov 2024 11:50 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी बुधवारी सकाळी इस्लामपूर येथील शाळा क्र.एक येथे सहकुटुंब सोबत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. सदृढ लोकशाहीसाठी सर्वांनी घराबाहेर निघून मतदान करावे, असे आवाहन यावेळी निशिकांत भोसले-पाटील(दादा) यांनी केले.

यावेळी त्यांच्या सोबत आई शशिकला भोसले-पाटील, पत्नी सुनीता भोसले-पाटील, कन्या प्रांजली भोसले-पाटील, चि. प्रत्युष भोसले-पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार येईल. इस्लामपूर मतदार संघात मतदारांना बदल हवा आहे. त्यादृष्टीने गावो-गावातून परिवर्तनासाठी उठाव झाला आहे.प्रत्येकाच्यातील उत्स्फुर्तपणा व ऊर्जा विजयापर्यत पोहचवेल. महायुतीतील घटक पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे मोठ्या मताधिक्यांनी आमचा विजय होईल,असा मला विश्वास आहे.












































































