हिंगोली । प्रचारात सहभागी झालेल्या कळमनुरी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामसेवकावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचे पत्र गटविकास अधिकारी, कळमनुरी यांना दिल्या असून तातडीने कारवाई करून अनुपालन अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला होता.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात कळमनुरी शहरातील शास्त्रीनगर भागात शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने प्रचार करत असताना त्यांच्या सोबत कळमनुरी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले कर्मचारी ग्रामसेवक शिवशंकर शेषराव गुट्टे हे प्रचार करत असतानाची व्हिडिओ चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली. कर्मचाऱ्याचा प्रचारात सहभाग असल्याचे त्यात दिसून येत आहे. सदर कर्मचाऱ्याविरुद्ध तातडीने कारवाई करण्याबाबतचे आदेश कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी दिले आहेत.
याबाबतचे पत्र गटविकास अधिकारी, कळमनुरी यांना दिल्या असून तातडीने कारवाई करून अनुपालन अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये मात्र धास्ती पसरली आहे
दरम्यान, संबंधित ग्रामसेवकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून त्याच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत.