Last Updated on 05 Nov 2024 6:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी १२ परदेशी कासवं जप्त केली. काल बँकॉकहून आलेल्या २ प्रवाशांच्या सामानाची तपासणी केली असता खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये या परदेशी कासवांच्या प्रजाती सापडल्या.

या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. वन्यजीव विभाग नवी मुंबई यांनी ८ Japanese Pond Turtle आणि ४ Scorpion Mud Turtle किंवा Red Cheek Mud Turtle अशी या प्रजातींची ओळख पटविली आहे. परदेशी कासवांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्यासाठी विमान कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.










































































