Last Updated on 30 Oct 2024 3:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर विधानसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज पार पडली. या छाननीमध्ये १ उमेदवारी अर्ज अवैध ठरला त्यामुळे आता २१ उमेदवारांचे २२ उमेदवारी अर्ज निवडणुकीसाठी पात्र ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी दिली.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी दुपारी संपली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीत अखेर २१ उमेदवारांनी आपली २३ नामनिर्देशन पत्र दाखल केली होती. या सर्व नामनिर्देशन पत्रांची बुधवारी छाननी करण्यात आली.
उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सर्व अर्जांची निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी छाननी केली.एक अर्ज उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले त्यामुळे निवडणुकीसाठी आता २१ उमेदवार पात्र ठरले आहेत.
छाननीच्या वेळी निशिकांत प्रकाश पाटील यांनी भारतीय जनता पार्टी कडून भरलेले नामनिर्देशनपत्र अवैध ठरवलेले आहे. कारण त्यांनी विहीत वेळेत भारतीय जनता पार्टी चा ए व बी फॉर्म सादर केलेला नाही. परंतु श्री निशिकांत प्रकाश पाटील यांनी नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी कडून भरलेले नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात आलेले आहे.
हे वाचलंत का – जयंत पाटील व निशिकांत पाटील नाव साधर्म्य असणारे तीन-तीन उमेदवार!
वैधरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या:- २१










































































