Last Updated on 27 Oct 2024 8:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भंडारा । फ्रीजमध्ये ठेवलेली भाजी दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना भंडाऱ्यातील सरांडी बुद्रूक येथे घडली.
ताराबाई कुंभरे (६५), शालिनी कुंभरे (४०), गोवर्धन कुंभरे (५२), सुजिता कुंभरे (१४), दुर्गा कुंभरे (११) अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत. लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुद्रूक येथील ताराबाई कुंभरे यांच्या घरी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात त्यांनी उडदाच्या डाळीच्या वड्यांची भाजी बनविली होती. कार्यक्रमानंतर घरातील सर्वांनी जेवण करून उरलेली भाजी घरातील फ्रीजमध्ये ठेवली होती. सकाळी ही भाजी गरम करून खाल्ल्याने पाच जणांची प्रकृती बिघडली. ही घटना उघडकीस येताच त्यांना सरांडी बुद्रूक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.












































































