नवी दिल्ली । पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत कर्जमर्यादा दहा लाख रुपयांवरुन वाढवून वीस लाख रुपये करण्यात आली आहे. वित्त मंत्रालयानं याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै २०२४ ला केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये ही घोषणा केली आहे. योजनेंतर्गत दहा लाखांच्या वर आणि वीस लाखांपर्यंतच्या कर्जासाठी तरुण प्लस ही नवी श्रेणी समाविष्ट करण्यात आली आहे.