मुंबई । राज्यात तोळ्यामागे सोन्याचे दर तोळ्यामागे ८० हजारांच्या पुढे गेले असून चांदी किलोमागे १ लाख रुपये झाली आहे. कालच्या तुलनेत सोनं-चांदी आज सुमारे ४००-५०० रुपयांनी महागलं. २४ कॅरेट सोनं जीएसटी शिवाय ७८ हजार ७०० रुपये तोळा आणि २२ कॅरेट सोन्याचे व्यवहार ७८ हजार ४०० रुपये दराने होत होते. चांदीचे व्यवहार ९८ हजार ८६२ रुपये किलो दरानं होत होते.
सोन्या-चांदीचे दर सध्या आकाशाला भिडले आहेत. दिवाळीपूर्वीच सोने पुन्हा एकदा ऑलटाइम हायवर पोहोचले आहेत. दिवाळी आणि लग्नसराईमुळं ही दरवाढ होते आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातले चढ-उतार, महागाईचे दबाव आणि जागतिक राजकीय तणाव यांसारख्या आर्थिक घटकांचाही सोन्याच्या दरांवर प्रभाव पडतो आहे.
साभार : प्रसार भारती