Last Updated on 22 Oct 2024 10:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथील ज्योतिष शास्त्री प्रभाकर जंगम यांच्या मंगल ज्योतिष वास्तु संशोधन केंद्राच्या वतीने संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष उल्लेखनिय यश व समाजासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
ज्योतिष शास्त्री प्रभाकर जंगम यांच्या मंगल ज्योतिष वास्तु संशोधन केंद्राच्या वतीने वतीने विशेष उल्लेखनिय यश व समाजासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींचा हे केंद्र नेहमीच सन्मान करीत असते. या वर्षी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जयकर जाधव, अंगणवाडी आदर्श सेविका उर्मिला जयकर जाधव, विजय पोवेकर या तिघांचा नुकताच विशेष सन्मान करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून मारुती जंगम उपस्थित होते.
ज्योतिष केंद्राचे ज्योतिष शास्त्री प्रभाकर जंगम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन उमेश जंगम यांनी केले.
या कार्यक्रमासाठी जंगम समाज संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ जंगम, उपाध्यक्ष अंकुश जंगम, संचालक महेश जंगम, संतोष जंगम, योगेश जंगम, विश्राम जंगम, सुभाष जंगम, शेखर जंगम, सुनील जंगम आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथमेश जंगम यांनी आभार मानले.










































































