सांगली । येथील रेडिओ ऑरेंज ९३.५ एफएम या वाहिनी द्वारे आयोजित ऑरेंज दांडिया नाईट हा उपक्रम नुकताच पार पडला. या निमित्ताने सांगली व परिसरातील युवक व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद दिला. सांगली येथील रोटरी क्लब लॉन्स येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मनोरंजनाची निखळ सेवा देत असताना लोक सहभागावर आधारित उपक्रम घेण्याच्या अनुषंगाने ऑरेंज दांडिया नाईट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ऑरेंज युथ क्लबच्या माध्यमातून विविध महाविद्यालय व महिलांचे गट या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष सहभागासाठी आवाहन करण्यात आले होते. त्याचबरोबर सहभागींसाठी विविध आकर्षक बक्षीस ठेवण्यात आली होती.
मराठी हिंदी गाण्यांवर ठेका धरत सहभागिनी दांडिया नृत्याचा आनंद घेतला. यावेळी श्री व सौ डॉ विलास कुलकर्णी, आदी अरिहंत संस्थेचे आदिनाथनसलापुरे, बजाज कम्पनीचे अक्षय काळे, विप्लव कासलीवाल, बांधकाम क्षेत्रातील मान्यवर प्रमोद शिंदे तसेच रवींद्र खिलारे, प्रशांत पाटील, निलेश मिंचे, अरुण नरळे, पोरे फुड्सचे पवन पोरे, टेकस्पॉटचे अविनाश सकट, अशोक रेळेकर, धीरज नसलापुरे, दैनिक ललकार चे ऋषिकेश खराडे, अमरनाथ खराडे, श्री ऍड्स चे अविनाश दीक्षित, मेकोव्हरचे विनायक पोरे, गारुड फिल्मचे दिग्दर्शक प्रताप सोनाळे, पायल पांडे, झछक च्या अमृता कुलकर्णी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन नॅशनल हेड अजय मोकडे, झोनल हेड गिरीश लिलहारे, यशवंत कुलकर्णी, सुरज पाटील, युवराज जाधव, सम्राट भोसले, अंकुश उंडे यांनी केले. सूत्रसंचालन आर जे गिरिराज, आर जे निकिता व आर जे नीला यांनी केले.