सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पुरुष कामगार भजनी मंडळा ने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गट कार्यालयाने सांगली येथे आयोजित गटस्तरीय कामगार पुरुष भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला असून या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघाने उत्कृष्ठ तालसंचन,उत्कृष्ठ तबलावादक,उत्कृष्ठ गायन ही व्यक्तिगत बक्षिसेही मिळविली आहेत.
यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे व्यवस्थापक एचआर संदीप भोसले, महावितरणचे आस्थापना अधिकारी प्रकाश शिंदे,सह्याद्री स्टार्चचे व्यवस्थापक एचआर विश्वास पाटील,कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार यांच्या हस्ते विजेत्या संघास बक्षिस वितरण करण्यात आले.
सांगली येथील वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील ललित कलाभवन येथे ही गट स्तरीय (सांगली व सातारा जिल्हा) भजनी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत संघप्रमुख विकास कणसे यांनी उत्कृष्ट तालसंचन,विजय उर्फ विनायक वाडेकर यांनी उत्कृष्ट तबलावादक व सर्जेराव देशमुख यांनी उत्कृष्ट गायन अशी व्यक्तिगत बक्षिसे मिळाली आहेत. राजारामबापू पाटील कारखान्याच्या भजनी संघात विकास कणसे, सर्जेराव देशमुख,धनाजी पाटील दिलीप पाटील,महादेव जांभळे,बाबासो माने,विठ्ठल नांगरे,गुरुप्रसाद खोत,बाळासाहेब माने, लालासो पवार यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.
राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील,उपाध्यक्ष विजय पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, एचआर मॅनेंजर अनिल पाटील, कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. या संघाला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने केंद्र संचालक पियुष पाटील,गणेश कुंभार, आक्काताई डांगे यांनी मार्गदर्शन केले आहे.