सांगली । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील हे राज्याच्या राजकारणात व्यस्त आहे. आपणा सर्वांच्या वतीने ते राज्याच्या राजकारणात महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. तरीही त्यांचे आपल्या मतदारसंघावर पूर्ण लक्ष आहे,असा विश्वास राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखानाचे अध्यक्ष,युवा नेते प्रतीक पाटील यांनी कृष्णा काठावरील गावातील विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला. श्री.पाटील यांच्या हस्ते कृष्णा नदीकाठावरील ६ गावात ९ कोटी १२ लाखाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यामध्ये रेठरेहरणाक्ष येथे १ कोटी १५ लाखाच्या ४ कामांचा,नवेखेड येथे १ कोटी ९४ लाखाच्या २ कामांचा, जुनेखेड येथे ५ कोटी ४५ लाखाच्या २ कामांचा,मसुचीवाडी येथे २२ लाखाच्या एका कामाचा,दुधारी येथे ३७ लाखाच्या २ कामांचा,आणि ताकारी येथे रुपये २५ लाखाच्या १ कामाचा समावेश आहे. याप्रसंगी जेष्ठ नेते बी.डी.पवार, संचालक दादासो मोरे,कृष्णेचे संचालक जे. डी.मोरे,सुजित मोरे,धनाजी बिरमुळे,महानंद चे माजी अध्यक्ष विनायक पाटील,माजी सरपंच अर्जुन पाटील, सर्जेराव कदम, सरपंच राधिका पाटोळे, उपसरपंच संजय कदम, धनाजी पाटील, सुहास पाटील, प्रा.राहुल पाटील, आनंदराव लकेसर, सरपंच नागेश पाटील, उपसरपंच सागर पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री.पाटील म्हणाले,साहेबांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची महत्वाची जबाबदारी आहे. ते सध्या राज्यात शिव स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून फिरत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निश्चितीपासून सर्व जबाबदाऱ्या ते पार पाडत आहेत. तरीही त्यांचे आपल्या मतदारसंघावर लक्ष असून त्यांच्या विशेष प्रयत्नातून आपणास मिळालेल्या निधीतून गावातील विकास कामे पूर्ण करूया.
रेठरेहरणाक्ष येथे उमेश पवार,उपसरपंच अभिजित मोरे,सुरेश पवार,नवेखेड येथे सरपंच अश्विनी गावडे,उपसरपंच सूरज चव्हाण,माजी सरपंच प्रदीप चव्हाण,माजी उपसरपंच रविंद्र चव्हाण,राजेंद्र चव्हाण, सयाजी कदम,राजेंद्र चव्हाण,संताजी गावडे, जुनेखेड येथे सरपंच सौ.पाटील,उपसरपंच सम्राट पाटील,सतिश पाटील,आर.के.पाटील, विठ्ठल पाटील, विजय पाटील,वैभव डिसले, सुरेश कदम, गुलाब पाटील,ताकारी येथे जगन्नाथ पाटील,विशाल पाटील,दिनकर सावंत,राजाराम पाटील,सचिन पाटील, शामराव सोळवंडे,कमलाकर भांबुरे,रमेश पाटील,कुमार टोमके,संजय पाटील,दुधारी येथे जीवन कदम,विश्वास पाटील,मसूचीवाडी येथे भाऊसो कदम,दादासो कदम,प्रशांत कदम,विश्वास कदम,अमोल कदम,प्रकाश माने,हौसेराव कदम,शिवाजी कदम यांच्यासह गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.