अर्हन सचिन गरुड याची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मृण्मयी कणसे हिचे मैदानी स्पर्धेत यश
जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत आरुष प्रसन्न शहाचे यश
सांगली । इस्लामपूर येथील प्रकाश पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवले.
अर्हन सचिन गरुड याने इस्लामपूर येथे झालेल्या १४ वर्षा खालील मुले गटात तृतीय क्रमांक पटकवला. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वाळवा तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत २०० मी धावणे या खेळ प्रकारात मृण्मयी संदीप कणसे या खेळाडूने प्रथम क्रमांक पटकावला. तिची सांगली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सांगली जिल्हास्तरीय शालेय १४ वर्षाखालील रोलर स्केटिंग स्पर्धेत प्रकाश पब्लिक स्कूलचा खेळाडू आरुष प्रसन्न शहा याने इनलाईन या प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
खेळाडूंच्या या यशाबद्दल त्यांचे शाळेचे संस्थापक निशिकांत भोसले-पाटील, शाळेच्या प्रशासिका सुनिता भोसले–पाटील, प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. मधुकुमार ए नायर, उपप्राचर्या सिंधू नायर यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.