सांगली । कामेरी (ता.वाळवा) येथील प्रतिक जाधव यांची ॲडोब या अमेरिकन कंपनीच्या प्रशिक्षक परिक्षेत सुयश संपादित केल्याबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस अधिक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते व ज्ञानेश्वर मुळे परराष्ट्र सचिव भारत सरकार यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
इस्लामपूर येथील डॉ. एन.टी घट्टे चारिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला. ॲडोब ही अमेरिकन फोटोशाॅप साॅप्टवेअर कंपनी आहे.या कंपनी द्वारे फोटो व व्हीडिओ इडिटींगचे काम चालते.याच साॅफ्टवेअरची नुकतीच प्रशिक्षण परिक्षा पार पडली.यात प्रतिक जाधव यांनी १ हजार गुणांच्या परिक्षेत ८९७ इतके उच्चांकी गुण मिळवून महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला.तो राज्यातील पहिला प्रशिक्षक फोटो ग्राफर ठरला आहे. प्रतिकच्या या यशाबद्दल बालाजी मिडीयाचे रामचंद्र जाधव व अमरावतीच्या हर्षिता कावरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
यावेळी पोलीस अधीक्षक मित्तेश घट्टे,प्रा. शामराव पाटील,ॲड. बी.एस.पाटील,डॉ. एन.डी.घट्टे,पी.आर.पाटील,राहूल कुलकर्णी,आशोक रेडेकर,दिलीप कोळेकर मान्यवर उपस्थित होते.