Last Updated on 15 Sep 2024 2:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि.16 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता कारखाना कार्यस्थळावरील प्रांगणात संपन्न होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील हे या सभेस मार्गदर्शन करणार आहेत. कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांनी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी केले आहे.
स्व.बापूंनी 1968 साली साखराळे माळा वर साखर कारखान्याची उभारणी करून वाळवा तालुक्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली आहे. तर माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कारखान्याने नेत्रदीपक प्रगती साधली आहे. या प्रगतीमध्ये ऊस उत्पादक सभासदांचा वाटा मोलाचा आहे.
कारखान्याच्या 55 व्या वार्षिक सभेची नोटीस,अहवाल ऊस उत्पादक सभासदांना पोच केलेले आहेत. सभासदांनी या सभेस वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे,असे आवाहन प्रतिकदादा पाटील यांनी केले.
कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, देवराज पाटील,कार्तिक पाटील,विठ्ठल पाटील,प्रदीपकुमार पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,सचिव डी.एम. पाटील यांच्यासह संचालक,अधिकारी सभेची तयारी करीत आहेत.







































































